#ChitraWagh #KishoriPednekar #ThreatLetter #MaharashtraTimes<br />महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचं धमकी देणारं पत्र आल्याने मुंबईत सध्या खळबळ माजली आहे.सर्व प्रकरणाला राजकीय रंग असल्याचं म्हटलं जात आहे.शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली. मात्र यावेळी कायंदे यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. चित्रा वाघ यांनी मनीषा कायंदे यांच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे." महापौरांसाठी दखल घ्यावी एवढी मोठी कार्यकर्ती मी नाही " असं म्हणत त्यांनी टोला लगावला.